श्रीरामपुरात तरूणाचा खून करून मृतदेह कालव्यात फेकला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गळ्यावर चाकूने वार करून कालव्यात फेकलेला तरूणाचा मृतदेह गुरूवारी श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव परिसरात भोकर चारीत आढळला. शहर पोलिसांनी याबाबत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हरेगाव रस्त्यावरील एस कॉर्नरच्या पुढे वडाळा महादेव हद्दीत भोकर चारीत हा मृतदेह होता. 

या तरुणाचा गळा धारदार शस्त्राने चिरलेला अाहे. त्याच्या अंगात जीन्स पॅन्ट व टी शर्ट आहे. त्याच्याजवळ गांजा, चिलीम व निरोधचे पाकीट आढळले. हातावर आयएव्हीएक्स अशी अक्षरे गोंदलेली आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शिरसगाव, हरेगावसह श्रीरामपूर परिसरातील काही लोकवस्त्यांमध्ये जात मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. तथापि,ओळख पटू शकली नाही.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.