'लवरात्री'ला विरोध,सलमान खान हिंदू संघटनांच्या रडारवर


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पद्मावत या सिनेमाला करणी सेनेने केलेला कडवा विरोध आपण सगळ्यांनीच पाहिला. आता एक नवा सिनेमा हिंदू संघटनांच्या रडारवर आहे. आणि हा सिनेमा आहे सलमान खान प्रॅडक्शन्सचा 'लवरात्री'..या सिनेमाच्या नावाला विश्व हिंदू परिषदेने विरोध केलाय.सलमान खानची निर्मिती असलेला लव्हरात्री गुजरातमधली कथा दाखवतो. 


'लवरात्री'  या नावामुळे हिंदूंचा सण नवरात्रीचा अपमान होत असून त्यातून चुकीचा संदेश जात असल्याचा आक्षेप त्यांनी ठेवलाय. त्यामुळे सिनेमाचं नाव बदललं नाही तर हा सिनेमा रिलीज होऊ देणार नसल्याचा इशारा विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनी पीटीआई या वृत्तसंस्थेशी बोलताना दिलाय. सलमानचा हा सिनेमा ५ आॅक्टोबरला रिलीज होईल.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.