सलग बाराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेल दरात वाढ.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्नाटक निवडणुकीनंतर आज सलग बाराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत.आज सकाळी 6 वाजता पेट्रोलच्या दरात पेट्रोल 36 पैशांनी तर डिझेल 22 पैशांनी महागलं अहमदनगर मध्ये आज पेट्रोलचा दर आहे 85 रुपये 61 पैसे तर डिझेल 20 पैशांनी वाढल्यामुळे ते थेट 72 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.

दरम्यान, इंधन दरवाढीवर दीर्घकालीन उपाय काढण्यावर काम सुरुय, एवढंच उत्तर केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे. पण वाढत्या इंधन दरवाढईमुळे देशभरात आता संतापाचा उद्रेक होऊ लागला आहे. या इंधन दरवाढीचा सगळ्यात जास्त फटका हा सर्वसामांन्याना होताना दिसतो.दरम्यान, इंधनाला जीएसटीमध्ये आणण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पण या सगळ्यातून आता काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.