शिर्डी साईबाबा संस्थानकडून ६६ लाखांचा घाेटाळा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टने २०१५ च्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळयातील गर्दीच्या नियाेजनासाठी पाेलिसांच्या मागणीनुसार सुरक्षा साहित्य खरेदी केले होते . माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीत अहमदनगर पाेलिस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या अंदाजित दरांपेक्षा प्रचंड चढया दराने हे साहित्य खरेदी केल्याचे स्पष्ट झाले अाहे.

संस्थानने एक काेटी ४५ लाख रुपयांचे वस्तू खरेदी केल्या असून त्यातील ६६ लाख ५६ हजार रुपयांचा भ्रष्टाचार केला अाहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चाैकशी करून दाेषींवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट अाणि पराग गाेखले यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी केली. पुण्यात हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले हाेते

याबाबत आरोप करताना घनवट यांनी सांगितले कि, ''नगर पाेलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव दिलेल्या वस्तूंच्या यादीत संगणक, प्रिंटर, रिसाेग्राफर, दाेन एअरकंडीशनर अशा गाेष्टींचा समावेश असून त्याची चाैकशी व्हावी. ६० हजार रुपयांचा मनीला राेप (दाेर) १८ लाख ५० हजार रुपयांना, रिचार्जेबल टाॅर्चेस प्रती नग ४०० रुपयांचे प्रत्येकी तीन हजार रुपयांना, दाेन हजार रुपयांचा सार्इन बाेर्ड नऊ हजार २०० रुपयांना तर पाच हजार रुपयांची ताडपत्री २२ हजार ५७५ रुपये एवढ्या चढ्या दराने खरेदी करण्यात अाले.''

कुंभमेळा काळात पाेलिसांकडे साेपवलेल्या वस्तू अजूनही शिर्डी संस्थानने स्वत:कडे जमा करून घेतलेल्या नाहीत. सदर वस्तूंचा वापर २०१८ मध्ये हाेणाऱ्या 'साई महासमाधी शताब्दी साेहळ्यात' केला जाणार असल्याचे उत्तर संस्थानने माहिती अधिकारात दिले अाहे. सन २०१५ मध्ये खरेदी केलेल्या वस्तू २०१८ मध्ये वापरायच्या हा भ्रष्टाचार असून त्याची चाैकशी व्हावी.अशी मागणी यावेळी करण्यात आली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.