मतदार संघातील सर्व विकासकामांना वेग - खा.दिलीप गांधी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची प्रतिमा उंचविण्याबरोबरच देशाला विकासाच्या शिखरावर नेले आहे. देशात विविध योजना प्रभावीपणे राबवून विकास करत आहेत. नगरसाठीही मोठा निधी केंद्र सरकारने मंजूर केला आहे. नगरचा समावेश भारतमालेत झाल्यामुळे मतदार संघातील सर्व विकासकामांना वेग आला आहे. असे प्रतिपादन खासदार दिलीप गांधी यांनी केले. 


नगर तालुक्यातील निमगांव वाघा येथे खा.गांधी यांच्या प्रयत्नातून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या हिरवेबाजार रस्ता ते जाधव वस्ती या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ खा.गांधी यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
खा.गांधी म्हणाले, ज्या गावातील रस्ते चांगले ते गाव विकासाच्या दिशेने पुढे जाते. मतदार संघातील सर्व गावे, विकसित व्हावीत, यासाठी प्राधान्याने गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांचा समावेश प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत केला आहे. आपल्या गावाचा विकास व्हावा, यासाठी प्रत्येक सरपंचाने काही कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. पोपट पवार यांच्या हिवरेबाजार प्रमाणे आपले गाव आदर्श व्हावे, यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.