जेऊरमध्ये जमिनीच्या वादातून राडा ! पाच जणांविरुद्ध ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल. .


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील जेऊर येथे शेतातील बांधाच्या वादातून एकास जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तलवारीने जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध मारहाणीसह ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जेऊर बायजाबाई येथे विनायक बाबुराव वाघमारे (वय ४२) यांची शेतजमिन आहे. त्यांच्या शेतीच्या बांधाजवळ बाबासाहेब शिंदे यांची जमिन असून त्यावरून दोघांमध्ये वाद होते. सोमवारी सकाळी वाघमारे हे दूध घेवून जात असताना मयुर बाबासाहेब शिंदे, बाबासाहेब निवृत्ती शिंदे, दिपक बाबासाहेब शिंदे, पप्पु बाबासाहेब शिंदे व डिगु (पूर्ण नाव माहित नाही) यांनी वाघमारे यांना आडवून शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली.

दिपक शिंदे याने तलवारीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत वाघमारे हे जखमी झाले असून त्यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.