श्रीरामपूर रेल्वे स्थानकाजवळ अनोळखी स्त्रीचा मृतदेह आढळला

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूरमध्ये रेल्वे स्थानकाच्या फलाटानजीक एका अंदाजे ३५ वर्षे वय असलेल्या अनोळखी स्त्रीचा मृतदेह आढळला आहे.


याबाबत रेल्वे पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की बुधवार दि. २३ मे रोजी श्रीरामपूर रेल्वे स्थानकाच्या फलाटाजवळ एका स्त्रीचा कोणत्यातरी दीर्घ आजाराने नैसर्गिक मृत्यू झाला. तीचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. ओळख पटण्यासाठी तीचे प्रेत शहरातील स्मशानभूमीत ठेवण्यात आले आहे. ही स्त्री अंगाने सडपातळ असून चेहरा लांबट आहे. अंगात लाल ठिपके असलेली साडी, पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज आहे. यासंदर्भात कुणाला काही माहिती असल्यास श्रीरामपूर रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे पोलीसमधील नाईक वाय. ए. खान यांनी केले आहे.

----------------------------


अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.