पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वीकारले विराट कोहलीचे आव्हान !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून दिल्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी 'हम फिट तो इंडिया फिट' ही मोहीम सुरू केली. प्रत्येक भारतीयाने तंदुरुस्त होण्यासाठी रोज किमान दहा सूर्यनमस्कार घालावेत, असे आवाहन त्यांनी केले. 


या आवाहनाला प्रतिसाद देत विराट कोहलीने कंबरेखालचा व्यायाम करत असल्याचे चित्रण प्रसिद्ध करून आपली पत्नी अनुष्का शर्मा, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना तंदुरुस्तीबाबत आव्हान दिले. पंतप्रधानांनीही त्वरित दखल घेत ट्विट केले, विराट, तुझे आव्हान स्वीकारले. लवकरच मी माझ्या तंदुरुस्तीबाबतचे चित्रण पाठवेन.. विराट कोहलीसह बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, सिने कलाकार मनोज तिवारी, सलमान खान, टायगर श्रॉफ तसेच वेटलिफ्टर बबिता फोगट आणि अपंग बॅडमिंटनपटू मानसी जोशी यांनीही या मोहिमेला प्रतिसाद देत आपण करत असलेल्या व्यायामाची चित्रणे प्रसिद्ध केली आहेत.

----------------------------


अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.