सरकारी बँकांनी पार केला तोट्याचा विक्रम,देशातील १३ बँका नुकसानात.अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जानेवारी-मार्च २०१८ या तिमाहीमध्ये सरकारी बँकांचा तोटा हा ५० हजार कोटी रुपयांपर्यंत जात असून याआधीच्या आर्थिक वर्षामध्ये याच काळात हा तोटा केवळ १९ हजार कोटी रुपये होता. म्हणजे त्या वर्षातील तोट्यापेक्षा ही रक्कम दुपटीपेक्षाही जास्त असल्याचे दिसून येत आहे. बँकांना असणारा हा भरभक्कम तोटा रिझर्व्ह बँकेमुळे झाला आहे. 

कारण रिझर्व्ह बँकेने सर्व कर्जांबाबत असलेल्या पुनर्रचनेच्या योजना संपुष्टात आणल्या आहेत. त्यामुळे सरकारवर पुनर्निधारित रकमेपेक्षा जास्त पैसे बँकेमध्ये टाकण्यासाठीचा ताण वाढला आहे.. ज्या १५ सरकारी बँकांनी गेल्या आर्थिक वर्षामध्ये चौथ्या तिमाहीतील परिणाम घोषित केले आहेत, त्यामध्ये इंडियन बँक व विजया बँक या वगळता सर्व १३ बँका नुकसानात आहेत.

या सर्व १५ बँकांच्या एकत्रित उत्पन्नाचा विचार करता ४४२४१ कोटी रुपयांचा तोटा समोर येतो. उर्वरित सहा बँकांचे निष्कर्ष अजून हाती आलेले नाहीत. ते आल्यानंतर हा तोटा ५० हजार कोटी रुपयांच्या वर जाणार आहे, हे निश्चित.. अजून आयडीबीआय बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनायटेड बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आदी सरकारी बँकांचे चौथ्या तिमाहीचे निष्कर्ष हाती आलेले नाहीत. यामध्ये केवळ बँक ऑफ बडोदाने ऑक्टोबर-डिसेंबर २०१७ या तिमाहीमध्ये नफा मिळवला होता.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.