नाशिकमध्ये माजीमंत्री छगन भुजबळांचा राष्ट्रवादीला दे धक्का!


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी दणदणीत विजय प्राप्त केलेला असताना या निवडणुकीत सर्वपक्षीय मतदारांसह राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या सहकार्यामुळे विजयी झाल्याचा दावा नवनिर्वाचित आमदार नरेंद्र दराडे यांनी केला आहे.


या निवडणुकीत सेनेच्या दराडे यांना तब्बल ३९९ मते मिळाली, तर ॲड. सहाणेंना अवघी २३२ मते मिळालीत. त्यामुळे दराडे यांनी सहाणेंचा १६७ मतांनी पराभव केला. या विजयावर बोलताना दराडे यांनी मला सर्वपक्षीय मतदारांचे सहकार्य लाभल्याचे सांगितले, तसेच जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी मला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केल्याचे नमूद केले.

निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी भुजबळांची घेतलेली भेट अन् विजयानंतर दराडेंनी भुजबळांच्या मदतीची कबुली दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गुरुवारी दराडे यांचा विजय घोषित झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दराडे पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ही कबुली दिली. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.