विजयासह चेन्नई मालामाल,चेन्नईने जिंकले इतके कोटी ....


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जगातली सर्वात महाग अशी क्रिकेट लीग म्हणून आयपीएलकडे पाहिलं जातं. चेन्नईने आज जेतेपद पटकावून तब्बल 20 कोटींचं बक्षीस पटकावलंय. चेन्नई सुपर किंग्सने वानखेडे स्टेडियमवर सनराइजर्स हैदराबादचा 8 गडी राखून धुव्वा उडवत आयपीएलच्या अकराव्या हंगामाचे जेतेपद पटकावले. या विजयासह चेन्नई मालामाल झाली.

मागील वर्षी मुंबई इंडियन्सने 15 कोटींचं बक्षीस पटकावलं होतं. पण या वर्षी बक्षीसाच्या रक्कमेत 5 कोटीने वाढ करण्यात आली होती.तर उपविजेती ठरलेली सनरायझर्स हैदराबाद पराभूत झाली असली तरी या टीमला 12.5 कोटींचं बक्षीस मिळणार आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.