नेवासा तालुक्यात महिलेवर अत्याचार,आरोपीस अटक


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवासा तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे २४ वर्षे वयाची महिला घरात एकटी असताना एकाने तिच्यावर अत्याचार केल्याची फिर्याद पिडीतेने शिंगणापूर पोलीस ठाण्यात दाखल केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बऱ्हाणपूर येथील २४ वर्षे वयाच्या एका महिलेने लेखी फिर्याद दिली की, १८ मे २०१८ रोजी दुपारी २ ते ४ वाजण्याच्या दरम्यान तीचा नातेवाईक असणारा मुलगा दारू पिऊन घरात आला व म्हणाला मला जेवण करायचे आहे. त्याला जेवण वाढून देत असताना त्याने माझ्या घराचा दरवाजा बंद करून कडी लावून अत्याचार केला. तसेच हा प्रकार कुणाला सांगितला तर जीवे मारून टाकील अशी धमकी दिली. या घटनेनंतर महिलेने फिर्याद दाखल केली. शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केलेली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.