संगमनेरमध्ये पाच वाहनांचा विचित्र अपघात,एक ठार, दोन जखमी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात चार वाहनांच्या विचित्र झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना गुरुवार दि. २४ मे रोजी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतुक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. 

नाशिक-पुणे मार्गावरील चंदनापुरी घाटातील एका धोकादायक वळणावर गुरुवारी पहाटे आंब्याची वाहतुक करणारा टेंम्पो पलटी झाला. चौपदरीकरण झालेल्या या मार्गावर महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत मिळवुन देत हे वाहन रस्त्यातुन बाजुला घेणे आवश्‍यक होते. मात्र त्यांनी अपघातातील वाहन बाजुला घेण्यासाठी मदत केली नाही, परिणामी पाठीमागुन भरधाव वेगात आलेला एक टेम्पो या वाहनाला धडकला.

त्यापाठोपाठ रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने वाचविण्याच्या प्रयत्नात एक कंटेनर थेट दुभाजकावर जाऊन अडकून पडला. त्यानंतर मागुन आलेला एक दुचाकीस्वार अपघातग्रस्त दोन वाहनांना धडकला. एवढे होत नाही तोच आणखी एक भरधाव वेगात आलेला टेंम्पोदेखील या वाहनांना धडकून रस्त्याच आडवा झाल्याने रस्ताची एक लेन वाहतुकीला बंद झाली होती. या अपघातात कैलास अशोक पाटील ( वय 35 ) रा. शहापूर, अंमळनेर यांचा मृत्यु झाला आहे.व युमेश कुमार सिंग सह आणखी एक जण जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.