अवघ्या एक हजार रूपयांच्या घरपट्टीमुळे गमावले सरपंचपद !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कर्जत तालुक्यातील कोळवडी बेनवडी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच मंदा रामदास धुमाळ यांनी ११४० रूपये, तर उपसरपंच मच्छिंद्र गायकवाड ७२५ रुपये घरपट्टी वेळेत न भरल्याने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दोघांचे सदस्यत्व रद्द केले आहे. 


याबाबत सदस्य गणेश गदादे, दीपाली संतोष गदादे व छाया बबन गदादे यांनी तक्रार अर्ज दिला होता. कर्जत तालुक्यातील कोळवडी बेनवडीचे सरपंच मंदा रामदास धुमाळ व उपसरपंच म्हणून मच्छद्रिं गायकवाड यांनी आपल्या कार्यकाळात ग्रामपंचायतीची घरपट्टीच भरली नाही. 

याबाबत ग्रामपंचायत सदस्य गणेश गदादे, दीपाली संतोष गदादे व छाया बबन गदादे यांनी दि.१० एप्रिल २०१८ रोजी याबाबततकारदार यांनी आपल्या लेखी युक्तीवादात म्हटले आहे की, सरपंच मंदा धुमाळ यांनी आपल्या सन २०१६-१७ व २०१७-१८ ची अनुक्रमे ५८१ व ५५९ रुपये अशी न ११४० रुपये तर उपसरपंच मच्छद्रिं गायकवाड यांनीहि सन २०१६-१७ व २०१७-१८ ची अनुक्रमे ३७१ व ३५४ रुपये अशी एकूण ७२५ रु थकविले आहेत. त्यामुळे या दोघांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे असे म्हटले आहे. 

या सर्वाची बाजू जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महाराष्ट्र ग्राम पंचायतीच्या अधिनियम कलम १४ खंड (ह) प्रमाणे कोणत्याही ग्राम पंचायत सदस्याकडे ग्रामपंचायत कराची थकबाकी असल्यास ती त्याने बिल दिल्यापासून तीन महिन्याचे आत न भरल्यास असा सदस्य अपात्र ठरतो. याच नियमानुसार बेनवडी येथील मंदा रामदास धुमाळ व मच्छद्रिं गायकवाड हे सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरविण्यात येत आहेत. अर्जदाराचा विवाद अर्ज मंजूर करण्यात येत आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.