श्रीरामपूर तालुक्यात ग्रामपंचायत सदस्यावर बिबट्याचा हल्ला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे बिबट्याने एकावर हल्ला करून त्यास जखमी केले असून त्यास उपचाराकरीता अहमदनगर येथील दवाखान्यात पाठविण्यात आले आहे. बेलापूर येथे टिळकनगर परिसरात कुऱ्हे वस्ती या ठिकाणी राहात असलेले बेलापूर ग्रामपंचायतचे सदस्य सुनिल केदारनाथ कुऱ्हे हे आपल्या गट नबंर ११९मधील शेतात बारे बदलण्यासाठी गेले होते. 

यावेळी शेजारील अर्जुन कुऱ्हे यांच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. बिबट्याने पायाला चावा घेतला असता सुनिल कुऱ्हे यांनी आरडाओरडा केला व कशी बशी बिबट्याच्या तावडीतून सुटका करून घेऊन शेजारील बोरावके वस्तीवर धाव घेतली. त्यांना ग्रामस्थांनी तातडीने बेलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी आणले. त्यांच्या पायाला चार दात लागले असून जखम खोलवर गेलेली आहे. बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. सोनटक्के यांनी त्यांच्यावर उपचार करून लस उपलब्ध नसल्यामुळे त्यांना नगरला जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सुनिल कुऱ्हे यांना तात्काळ नगरला हलविण्यात आले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.