SP ऑफिस तोडफोड प्रकरणातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांची जामिनावर सुटका.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पोलिस अधीक्षक कार्यालय तोडफोडप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या ४१ आरोपींना न्यायालयाने गुरूवारी जामीन मंजूर केला. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली.प्रत्येकी १५ हजाराचा जामीन न्यायालयाने मंजूर केला.

केडगाव पोटनिवडणूक निकालाच्या दिवशी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर आ. संग्राम जगताप यांना चौकशीकामी बोलावले असता त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी पोलिस अधिक्षक कार्यालयात तोडफोड करुन धिंगाणा घातला. याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता .

याप्रकरणी सोमवारी (दि. २१ मे) सकाळी ४२ जण पोलिस ठाण्यात शरण आले. त्यामध्ये नगरसेवक कुमार वाकळे, संपत बारस्कर, समद खान, आरिफ शेख, अविनाश घुले, निखील वारे, दिपक सूळ, बाबासाहेब गाडळकर, प्रकाश भागानगरे, प्रा. अरविंद शिंदे, वैभव ढाकणे, दिलदारसिंग बीर, सुहास श्रिसाठ, महेश बुचुडे केरप्पा हुच्चे, सैय्यद अब्दुल वाहिद, सैय्यद शादाब इलियास, अशोक रोकडे, आवी शंकर इराबत्तीन, सागर बबन शिंदे, धीरज उकिर्डे, सुनील त्रिंबके, बबलू सुर्यवंशी, सय्यद मन्सूर मुनीर, सुरेश मेहतानी, मतीन सय्यद, कुलदिप भिंगारदिवे, दत्तात्रय ताकपिरे, फारुक रंगरेज, चंद्रकांत औशीकर, सत्यजीत ढवण, वैभव जाधव, राहुल शर्मा, मयुर बांगरे, किरण पिसारे, घनश्याम बोडखे, बाबासाहेब जपकर, राजेंद्र ससे, वैभव दारुणकर, अक्षय डाके, मयूर कुलथे, यांचा समावेश होता.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.