केडगाव हत्याकांडात विनाकारण नाव गोवले,कर नाही त्याला डर काय - आ. शिवाजीराव कर्डिले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्यात अनेकांशी संघर्ष करावा लागला. आता लोकसभा, विधानसभा निवडणुका सुरू होतील. त्यामुळे पुढारी फिरायला सुरू होतील. ५ वर्षे पुढाऱ्यांना समाजाचे काही देणे घेणे नसते. परंतु मी ५ वर्षे जनतेमध्ये राहून विकासाचे प्रश्­न मार्गी लावतो. त्यामुळे जनता नेहमीच माझ्याबरोबर राहते. 


जनता मला पाडू शकत नसल्यामुळे काही पुढारी खोट्या गुन्ह्यात मला अटकवण्याचे कारस्थान करतात. परंतु मी संघर्ष करणारा पुढारी आहे. राहुरी, पाथर्डी व नगर मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे ४० कोटींची विकासकामे मंजूर करून घेतली. 

यामध्ये नगर तालुक्यात १२ कोटी, राहुरी तालुक्यात १४.५ कोटी व पाथर्डीत १० कोटींची विकासकामे सुरू आहेत, असे प्रतिपादन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले.आ.कर्डिले यांच्या प्रयत्नातून ससेवाडी (ता.नगर) येथे सुमारे ४.५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी आ. कर्डिले उपस्थित होते 


मतदानावर विकासकामे केली जात नाहीत. नगर शहरात घडलेल्या घटनेत विनाकारण आमचे नाव गोवले आहे. कर नाही त्याला डर काय. ही घटना कोर्टाच्या अधीन आहे. कोर्टाच्या निकालानंतर जे काय माझ्या विरोधात घडले, ते जनतेला सांगेन, असे सांगितले.


आ. कर्डिले म्हणाले की, आपण मतदारसंघाच्या नेहमी संपर्कात असल्याने मला विकासकामे सांगावी लागत नाहीत. गावच्या समस्या काय आहेत हे आपण जाणतो. जलयुक्त शिवार योजना ही जिरायत भागासाठी वरदान ठरणारी योजना आहे. भविष्यात पाणी ही समस्या मोठी आहे. जलयुक्तमुळेच तिच्यावर मात करता येईल. 

----------------------------
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------
Powered by Blogger.