आ. संग्राम जगताप यांची सोशल मिडियातून बदनामी करणार्यांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :व्हॉटसअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करून आ. अरुण जगताप व संग्राम जगताप यांचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी योगेश साळुंके याने पोलिसांकडे अर्जाद्वारे केली असून राहुल चव्हाण नामक ग्रुप अॅडमीन विरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे.

साळुंके याने दिलेल्या अर्जात म्हटले आहे की,आ. अरुण जगताप व संग्राम जगताप यांच्या विरोधात 9373890876 या मोबाईल नंबरवरून आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून ते सोशल मिडियावर प्रसारीत केले.  त्यांनी लोक प्रतिनिधीचा अवमान केल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे.तरी याबाबत जय हो ग्रुपचा अॅडमीन राहुल चव्हाण(९०२८९०६५९५) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करावा, अशी मागणी योगेश साळुंके याने केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.