मधुकरराव पिचड यांची खेळी यशस्वी,विधानसभेसाठी जुळविली जातीची समीकरणे !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी अकोले नगराध्यक्षपद मराठा कुणबी समाजाकडे, तर उपनगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय (माळी) समाजाला देवून एक चलाख राजकीय खेळी केली आहे. भूल दिल्याशिवाय ऑपरेशन व दिशाभूल केल्याशिवाय राजकारण करता येत नाही,त्याचीच प्रचिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना या निवडीने आली.


विधानसभेसाठी जातीय समीकरणे !
उपनगराध्यक्षपदाला आरक्षण नव्हते. त्यामुळे चतुर खेळी करून पक्षाचे नगरपंचायतीतील गट नेते व पाणीपुरवठा समितीचे सभापती बाळासाहेब वडजे यांना पिचड यांनी पदाची संधी दिली. पिचड यांनी सत्तासमतोल बरोबर राखला. वडजे हे ओबीसी (माळी) आहेत. त्यांच्यासाठी हे पद पिचड यांनी देवून मराठा व माळी समाजाला चुचकारले आहे. या चतुर राजकीय खेळीने पुन्हा एकदा पिचड यांनी पक्षातील नाराजीचा सूर दूर केला आणि राजकीय सोयीसाठी जातीची समीकरणेही जपली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचे हे बेरजेचे राजकारण फायदेशीर ठरणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.