विधानपरिषदच्या 5 जागांचा निकाल जाहीर,भाजपा 2, सेना 2, राष्ट्रवादी 1 जागांवर विजयी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  विधानपरिषदेच्या 6 पैकी 5 जागांचा निकाल आज जाहीर झाला. अमरावती आणि चंद्रपुरात भाजपानं बाजी मारली असून, नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तसेच कोकणातील जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपा 2, सेना 2, राष्ट्रवादी 1 जागांवर विजयी झाले आहेतविधानपरिषद निवडणूक 2018 संपूर्ण निकाल

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था
शिवसेना - नरेंद्र दराडे (412 मतं)
राष्ट्रवादी - शिवाजी सहाणे (219 मतं)
शिवसेना 193 मतांनी विजयी

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था
राष्ट्रवादी - अनिकेत तटकरे (421 मतं)
शिवसेना - राजीव साबळे (221 मतं)
राष्ट्रवादी 200 मतांनी विजयी

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था
शिवसेना - विप्लव बाजोरिया (256 मतं)
काँग्रेस - सुरेश देशमुख (221 मतं)
शिवसेना 35 मतांनी विजयी

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था
भाजपा - प्रविण पोटे-पाटील (458 मतं)
काँग्रेस - अनिल मधोगरिया (17 मतं)
भाजप 441 मतांनी विजयी

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था
भाजपा - रामदास आंबटकर (550 मतं)
काँग्रेस - इंद्रकुमार सराफ (462 मतं)
भाजप 88 मतांनी विजयी

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.