अनिल राठोड यांची बदनामी करणार्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव हत्याकांडातील मयत संजय कोतकर व वसंत ठुबे तसेच शिवसेना उपनेते अनिल राठोड आणि शिवसेना पक्षाची सोशल मिडियात बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसवेक अजिंक्य बोरकर, सुरेश बनसोडे, ओंकार देशमुख, निलेश बांगरे, दिलदारसिंग बीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी संग्राम कोतकर व प्रमोद ठुबे यांनी केली आहे. 


याबाबत दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, संजय कोतकर व वसंत ठुबे यांची राजकीय वादातून शनिवार दि. ७ एप्रिल रोजी हत्या करण्यात आली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून मयत संजय कोतकर व वसंत ठुबे हे शिवसेना पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते. हत्याकांडानंतर शिवसेना उपनेते अनिलभैय्या राठोड व पदाधिकारी हे आम्हाला धिर देत असून शहरातील व्हॉटसअप ग्रुपवर व फेसबुकवर आमची व आमच्या पक्षाची तसेच हत्याकांडातील वडिल व भावांची नावे टाकून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते बदनामी करत आहेत.

या कृत्यामुळे आमच्या पक्षाचे बळ कमी करण्याचा तसेच वैयक्तीक लोकप्रियता कमी करण्याच्या दुष्ट हेतूने सदरचे षड्यंत्र हे लोक करत आहे. त्यामुळे आम्हाला व आमच्या पक्षातील लोकांना याचा मानसिक त्रास होत आहे. समाजामध्ये व परिसरामध्ये आमची होत असलेली बदनामी त्वरीत थांबविण्यात यावी तसेच अशा प्रकारे सोशल मिडियाच्या माध्यमातून आक्षपार्ह मेसज व व्हिडीओ क्लीप पाठवत असलेल्या लोकांवर सायबर कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संग्राम कोतकर व प्रमोद ठुबे यांनी केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.