विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :व्यवसायासाठी माहेरहून ५० हजार रुपये न आणल्याचा राग येऊन नवरा, सासू, सासरा यांच्याकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने विष घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी नवरा, सासू आणि सासरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, ललिता सुभाष इदे (वय २२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी काळू दत्तू गभाले (रा. मान्हेरे) यांनी फिर्याद दिली. नवरा सुभाष सखाराम इदे, सासरा सखाराम भाऊ इदे, सासू नुराबाई सखाराम इदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

अकोले तालुक्यातील मुतखेल गावात ललिता हिचे लग्न झाले. लग्नानंतर नवरा, सासरा, सासू यांनी बारीक सारीक कारणावरून ललिताला शिवीगाळ करून दमदाटी, मारहाण करण्यास सुरुवात केली. ते तिला उपाशी ठेवून मानसिक व शारीरिक छळ करीत असत. लग्न होऊन तीन वर्षे झाली तरी मूलबाळ होत नाही, यामुळे नवऱ्याने दुसरे लग्न करण्याची धमकी देऊन नांदायचे असल्यास टेंट (पर्यटन तंबू) आणण्यासाठी माहेरहून पन्नास हजार रुपये आणावेत म्हणून ललिताला मारहाण करण्यात येत होती.

या छ‌‌ळाला कंटाळून ललिता हिने तीन दिवसांपूर्वी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. काळू गभाले यांच्या फिर्यादीवरून नवरा सुभाष इदे, सासरा सखाराम इदे, सासू नुराबाई इदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.