श्रीगोंदा पोलिसांनी अंमली पदार्थांचा साठा केला जप्त.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सिद्धार्थनगर चौकात वाहन अडवून अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सहायक फौजदार अनिल भारती, कॉन्स्टेबल प्रताप देवकाते, वैभव गांगर्डे, नामदेव सगर, श्रीकांत वाबळे, सोनवणे व पुंड हे नाकाबंदी करीत असताना जामखेडकडून काळ्या रंगाची स्कॉर्पिओ (एमएच ४ बीएस ४४३७) वेगाने आली. या गाडीला पोलिसांनी बॅटरी व हात दाखवून थांबण्यासाठी इशारा केला. मात्र, गाडी न थांबता वेगाने काष्टीकडे निघून गेली. देवकते यांनी पाठलाग करून सरस्वती पुलावर स्कॉर्पिओ अडवली.

गाडीतून येणाऱ्या उग्र वासावरून झडती घेतली असता अंमली द्रव्य असलेला ड्रम आढळला. पोलिसांनी गाडीतील दोन तरुणांची चौकशी केली. दशरथ अंबाजी प्रजपती (२२, मूळ गाव ता. ताल, जिल्हा रतलाम, मध्यप्रदेश, हल्ली उरुळीकांचन, पुणे) व मुकेश शाहुरामजी प्रजापती (२३, राहणार हिम्मतखोडी, ता.ताल, जिल्हा रतलाम, मध्यप्रदेश, हल्ली उरुळीकांचन) या दोन तरुणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान हा माल जामखेड येथून मामा (नाव माहीत नाही, अंदाजे वय ४०) याच्याकडून आणल्याचे त्यांनी सांगितले. विक्रीसाठी दत्ता लोंढे (उरुळीकांचन) याच्याकडे चार पट उत्पादनासाठी माल चालवला असल्याचे त्यांनी सांगितले. हे द्रव्य अतिशय विषारी व शरीरास अपायकारक असल्याचे ताब्यात घेतलेल्या तरुणांनी सांगितले. ८० हजार किमतीचे ४० लिटरचे २० ड्रम व ४ लाख किमतीची स्कॉर्पिओ (एम एच ०४, बी एस ४४३७) पोलिसांनी ताब्यात घेतली असून, तपास पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महावीर जाधव करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.