महाराष्ट्राचे पाच आमदार दहशतवादी हल्ल्यातून बचावले !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जम्मू-काश्मीरमध्ये अभ्यास दौऱ्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील पाच आमदारांवर बुधवारी सकाळी अतिरेक्यांनी भीषण हल्ला केला. दीपक चव्हाण, विक्रम काळे, सुधीर पारवे, किशोरअप्पा पाटील आणि तुकाराम काते अशी हल्ल्यातून बचावलेल्या आमदारांची नावे असून सर्व सुखरूप आहेत. मात्र रस्त्यावरील सात पादचारी या हल्ल्यात जखमी झाल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या हल्ल्याची कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारली नव्हती. 
राज्यातील आमदारांचा गट जम्मू-काश्मीरमध्ये पंचायतराज समिती अभ्यास दौऱ्यानिमित्त गेला आहे. हे आमदार १९ मेपासून काश्मीरमध्ये असून अनंतनाग जिल्ह्यात बुधवारी सर्व आमदार गाडीने जात असताना दुपारी साडेबारा-एकच्या दरम्यान अतिरेक्यांनी त्यांच्या वाहनांवर हल्ला केला. शिक्षक आमदार विक्रम काळे, मुंबईतील मानखुर्दचे आमदार तुकाराम काते, जळगाव-पाचोऱ्याचे आमदार किशोरअप्पा पाटील, साताऱ्यातील फलटणचे आमदार दीपक चव्हाण आणि नागपूर-उम्रेडचे आमदार सुधीर पारवे या पाच आमदारांचा यामध्ये समावेश आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.