नगरसेवकास खुनाची धमकी,आ.संग्राम जगताप यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महापालिकेच्या केडगाव पोट निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शिवसेनेचे नगरसेवक योगिराज गाडे यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तब्बल दिड महिन्यानंतरआ. संग्राम जगताप यांच्यासह चौघाजणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


या प्रकरणी नगरसेवक योगिराज गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, केडगाव पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शुक्रवार दि. ६ एप्रिल रोजी मतदान केंद्रांबाहेर असताना आ. संग्राम जगताप, संदिप गुंजाळ, मयुर राऊत आणि माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी राजकीय वादातून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हंटले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.