निलेश लंकेंचा आ.औटीना पहीला राजकीय झटका,पारनेर शहरावर निलेश लंकेचे वर्चस्व.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेरमध्ये शिवसेनेचे आमदार विजय औटी यांना निलेश लंकेनी पहिला राजकीय धक्का दिला, नगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवार वर्षा नगरे तर उपनराध्यक्षपदी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत चेडे यांची निवड झाली असून शिवसेनेचे औटी गटाचे वैशाली औटी व दत्तात्रय कुलट यांचा पराभव झाला आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या पारनेर नगरपंचायतीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षाची होणारी निवड प्रतिष्ठेची बनली होती. शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या गटाचे जास्त नगरसेवक असतानाही सत्ता खेचण्यात अपक्ष यशस्वी झाले.

अडीच वर्षांपूर्वी याच वर्षा शंकर नगरे यांनी आमदार विजय औटी व त्यांचे कुटुंब राहत असलेल्या वार्डात शिवसेनेच्या उमेदवाराचा धुव्वा उडवत दणकेबाज विजय मिळविला होता. आता नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकत त्यांनी औटी यांच्या पारनेर मधील वर्चस्वाला सुरुंग लावला आहे.

पारनेर पंचायतीच्या अध्यक्ष - उपाध्यक्षपदाची निवड आज झाली पंचायतीचे एकूण 17 नगरसेवक आहेत. त्यापैकी आमदार औटी यांच्याकडे 12 नगरसेवक होते. विरोधात केवळ पाच होते. त्यामुळे औटी यांचाच नगराध्यक्ष होण्यात होणतीही अडचण नव्हती. असे असताना दहा नगरसेवक अज्ञातवासात गेले. त्यामध्ये औटी यांचे पाच नगरसेवक होते,हे विशेष.

नगरसेवक पळवून नेण्यात अपक्ष उमेदवार यशस्वी झाले त्यामुळे शिवसेनेचे आमदार विजय औटी यांना मोठा धक्का देण्याची हिंमत अपक्ष उमेदवारात झाली कशी, असा प्रश्न राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. यामागे शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष निलेश लंके यांचाच हात असल्याची चर्चा आहे. 
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.