फेक अकाऊंटवरुन महिलांना त्रास देणाऱ्या 26 वर्षीय तरुणाला अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महिलांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्रास देणाऱ्या 26 वर्षीय तरुणाला सायबर पोलिसांनी लातूरमधून अटक केली. या तरुणाने बनावट अकाऊंट तयार करून 658 महिलांना त्रास दिल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं. विश्वाजित जोशी असं संशयिताचं नाव आहे. रात्री-अपरात्री महिलांना व्हिडीओ कॉल करून अश्लील मेसेज पाठवून तो त्रास देत होता. 

विश्वजित जोशी या तरुणाने महिलांच्या नावाने 20 बनावट अकाउंट तयार करून 658 महिलांना त्रास दिल्याचं तपासात निष्पन्न झालं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास घेत त्याला अटक केली. विश्वजित जोशीला 25 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.