महापौर सुरेखा कदम यांच्या राजीनाम्याची शिवसेना नगरसेवकांकडून मागणी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  नगरसेवकांना विश्‍वासात घेऊन कामे होत नसतील तर महापौरांनी राजीनामा देऊन खुर्ची खाली करावी अन्यथा आमचा राजीनामा घ्यावा, अशा शब्दांत ढवण यांनी महापौर सुरेखा कदम यांना सुनावले. त्यामुळे महापौरांच्या दालनात चांगलाच गोंधळ झाला. तब्बल तासभर ढवण यांनी कार्यकर्त्यांसह महापौरांच्या दालनात ठिय्या मांडला होता. अखेर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ढवण यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.


शिवसेनेतील पक्षांतर्गत वाद आता चांगलाच उफाळून आला असून, मंगळवारी शिवसेनेचे उपशहरप्रमुख दिगंबर ढवण यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने तो चव्हाट्यावर आला आहे. कचऱ्याच्या प्रश्‍नावरून ढवण यांनी महापालिकेत आज चांगलाच गदारोळ घातला. 

नगरसेवकांना डावलून परस्पर बैठका घेण्यात येतात. नगरसेवकांना विश्‍वासात घेतले जात नाही, या कारणासह सावेडी कचरा डेपामुळे नागरिक त्रस्त झाले असून याबाबत महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी नगरसेवक शारदा ढवण व त्यांचे पती दिगंबर ढवण यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा नेण्यात आला. सुरुवातीला ढवण यांनी आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. 

परंतु, आयुक्‍तांनी या प्रश्‍नांसाठी अतिरिक्‍त आयुक्‍तांची भेट घ्या, असे सांगून ढवण यांना भेट नाकारली. त्यामुळे वैतागलेले ढवण यांनी अतिरिक्‍त आयुक्‍तांकडे कचऱ्याचा प्रश्‍न मांडून थेट महापौरांना निवेदन देण्यासाठी त्यांच्या दालनात आले. त्यांनी महापौरांना निवेदन दिल्यानंतर कचऱ्याच्या प्रश्‍नाबाबत अतिरिक्‍त आयुक्‍तांकडे जाऊन त्यांना जाब विचारण्याचा आग्रह धरला. तेव्हा महापौरांनी त्यांच्याकडे जाण्यास नकार देऊन कचऱ्याच्या प्रश्‍नाबाबत चर्चा झाली असून, तातडीने उपाययोजना राबविण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.