'ज्ञानेश्वर'च्या प्रपंच्यात मीठ कालवायचा प्रयत्न कोणी करू नका - नरेंद्र घुले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  ऊस गाळपात 'ज्ञानेश्वर' राज्यातील पहिल्या पाच कारखान्यात असून नगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक आहे. त्यामुळे कोण काय म्हणतो त्याला आता महत्त्व राहिले नाही. कारखान्याला बाधा आणण्याचे पाप कोणी करू नका. काही मदत करू नका, परंतु ज्ञानेश्वरच्या प्रपंच्यात मीठ कालवायचा प्रयत्न कोणी करू नका, असे टिकात्मक आवाहन माजी आमदार शंकारराव गडाख यांचे नाव न घेता ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे मुख्य मार्गदर्शक माजी आमदार नरेंद्र घुले यांनी केले.


 'ज्ञानेश्वर'च्या गळीत हंगामाची सांगता ज्ञानेश्वर माजी आमदार नरेंद्र घुले व अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते गव्हाणीचे विधीवत पूजन करून झाली. नरेंद्र घुले म्हणाले, मी नेवासे तालुक्यात विविध कामे केली यांचे कोणी हात धरले होते. चांगल्या चाललेल्या कामाला बोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्याची गचांडी धरून तू कोणते विकासाचे कामे केले ते दाखव म्हणून जाब विचारा. कारखान्यावर टीका करतांना थोडा विचार करून बोलले पाहिजे. कारण त्यावर अनेकांचे प्रपंच अवलंबून आहे. संकटावर मात करत संत नागेबाबांच्या पावन भूमीतील ज्ञानेश्वरने उच्चांकी गळीताचा कळस चढवला आहे.

१५ लाख २५ हजार साखर पोत्याचे उत्पादन केले आहे, तर ५ कोटी ५० लाख युनिट वीजनिर्मिती केलेली आहे. आजच्या तरूण पिढीला साखर कारखानदारी समजून घेतली पाहिजे. भविष्यात पाटपाणी, वीज व रस्ते यासाठी सतर्क रहावे लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ज्ञानेश्वरमुळे बाजाररपेठेतील सर्व व्यावसायिकांचे उत्पन्न वाढले. त्यामुळे स्पर्धा आपल्यातच करा. ही वास्तू आपली आहे या भावनेतून ज्ञानेश्वरला जपा, असा सल्लाही श्री. घुले यांनी यावेळी दिला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.