चास-निंबळक रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार,चार महिन्यात 26 लाख रुपये “खड्ड्या’त!


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्‍यातील चास-निंबळक रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. डांबरीकरण उखडून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी चार महिन्यांपूर्वी तब्बल 26 लाख रुपये खर्च केले आहेत. रस्त्यांवर खड्डे कसे काय पडले आहेत, असा आरोप पंचायत समितीचे सभापती रामदास भोर यांनी केला आहे.

पंचायत समितीचे सभापती रामदास भोर यांनी घेऊन याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व सार्वजनिक बांधकाम उपविभाग नगरचे उपअभियंता यांना निवेदन दिलेले आहे. निवेदनात भोर यांनी म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत चास ते निंबळक या रस्त्यावरील खड्डे व्यवस्थित भरलेले नाहीत. जे खड्डे काढले त्यांची खडी उघडी पडलेली आहे.

साईडपट्ट्या भरलेल्या नाहीत. साईडपट्ट्या मुरुमाने भरल्याने दगडगोटे टाकून भरलेल्या आहेत. आपल्या विभागातील शाखा अभियंता व उपअभियंता यांना लेखी व तोंडी सांगूनही काहीच फरकत पडलेला नाही. खड्डे बुजविताना अतिशय अनियमितता झालेली आहे. डांबर योग्य प्रमाणात वापरलेले नसल्यामुळे पुन्हा खड्डे पडलेले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला दिसून येत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.