अल्पवयीन मुलीचे राहुरीतून अपहरण


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी महाविद्यालया लगत असलेल्या वसाहतीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली आहे.मुलीच्या पालकांनी मंगळवारी फिर्याद दिल्याने राहुरी पोलीसात अज्ञात तरूणा विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपहरण झालेल्या १७ वर्षीय मुलीचे १२ वी शिक्षण पूर्ण झाले होते. 

२१ मे रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान मैत्रिणीने या मुलीच्या घरी जाऊन आम्हाला वाढदिवसाला जायचे आहे.हे कारण सांगत या अल्पवयीन मुलीला तिच्या घरातून आईच्या इच्छे विरुद्ध नेले होते. मुलगी दुपारी तीन वाजे पर्यंत घरी परतली नसल्याने आईने मैत्रिणीशी फोनवर संपर्क केला असता तुमची मुलगी माझ्या सोबत नाही हे उत्तर मैत्रिणीने दिले. या बाबत या मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.