माहेरी आलेल्या महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :माहेरी आलेल्या महिलेचा घरामागील विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी संगमनेरमधील आश्वी बुद्रूकमध्ये घडली. अनिता ऊर्फ सुरेखा सुरेश गोडगे (४२) असे मृत महिलेचे नाव आहे. अनिता रविवारी सकाळी आश्वी बुद्रूक येथे माहेरी आल्या होत्या. 

त्यांना माहेरी सोडल्यानंतर त्यांचे पती कनोली (संगमनेर) येथे एका दशक्रिया विधीसाठी गेले होते. माहेरच्या घरातील कामे केल्यानंतर घरामागील विहिरीजवळ उभ्या असलेल्या अनिता यांचा पाय घसरून त्या विहिरीत पडल्या. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. विहिरीत पडल्यानंतर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.