रुग्णालयात जावून तरुणीचा विनयभंग


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर शहरातील नविन नगर रोडवर असणाऱ्या एका खासगी रुग्णालयात जाऊन १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना सोमवार दि. २१ मे रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील एका खासगी रुग्णालयात १९ वर्षीय तरुणी उपचार घेत होती. सोमवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास बळीराम रमेश येवले (रा.घुलेवाडी) हा रुग्णालयात आला. यावेळी ही तरुणी रुग्णालयातील खाटेवर झोपलेली असताना तिचा हात धरुन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य त्याने केले. 

त्यामुळे या तरुणीने घाबरलेल्या अवस्थेत आरडाओरड केल्याने येवले हा रुग्णालयातून पळून गेला.याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी बळीराम येवले याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.