माळीवाडा परिसरातील दगडफेकप्रकरणी सात जण ताब्यात.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरून नगर शहरातील माळीवाडा परिसरातील पंचपीर चावडी येथे सोमवारी रात्री झालेल्या दगडफेक प्रकरणी कोतवाली पोलिसांनी १९ जणांसह १० ते १५ अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी ७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.  

अरबाज अब्दुल रहेमान शेख, शेख फैय्याज, इरफान हमिद शेख, अझहर अस्लम शेख, मुसद्दीक अब्दुल रहेमान शेख, इरफान इब्राहिम बागवान, फैजान शेख (सर्व रा. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे असून यातील समिर वस्ताद, अमन अन्वर वस्ताद, अरबाज समिर वस्ताद, रिहान खान, अरबाज रज्जाक बागवान, सोफीयान बागवान, माजीद बागवान, रिजवान रफिक बागवान, अन्वर वस्ताद (सर्व रा. नगर) यांच्यासह अनोळखी १० ते १५ इसम पसार झाले आहे. 

या दगडफेकीमध्ये तिघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरून दोन गटात दगडफेक झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, सहाय्यक पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे, कोतवाली पोलिस ठाण्याचे पो. नि. रमेश रत्नपारखी, तोफखाना पोलिस ठाण्याचे पो. नि. सुरेश सपकाळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.