२०१९ मध्ये घनश्याम शेलार यांना विधानसभेत पाठवा - प्रा. शशिकांत गाडे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सेना पक्ष ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करणारा पक्ष आहे. शेतकरी कर्जमुक्त करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा यासाठी संघर्ष चालू ठेवला. अाता जी कर्जमाफी झाली, ती फक्त शिवसेने मुळेच. जनतेने शिवसेनेच्या हातात सता देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केले. 

श्रीगोंदे तालुक्यातील कोसेगव्हाण येथे शिवसेनेच्या शाखा उद्घाटनप्रसंगी प्रा. गाडे बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा समन्वयक शेलार हे होते. गाडे म्हणाले, २०१९ मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदे-नगर विधानसभा मतदारसंघात कोणच्याही भूल थापा व आमिषाला जनतेने बळी न पडता, आपल्या मतदारसंघाच्या सर्व प्रश्नांची जाण असणारे अभ्यासू नेते घनश्याम शेलार यांना विधानसभेत पाठवावे.

शेलार यांच्या पक्ष प्रवेशावेळीच विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश पक्ष प्रमुखांनी दिले आहेत. शेलार यांना नगर तालुक्याच्या जोडलेल्या गावांमधून शेलार यांना मोठे मताधिक्य देणार असल्याची ग्वाही देत, तालुक्यातील शिवसैनिकांनी व जनतेने आता कामाला लागावे, असे आवाहन गाडे यांनी केले. 

शेलार म्हणाले, तालुक्याला यापूर्वी सत्तेत खूप मोठी संधी मिळाली. परंतु फसव्या घोषणांच्या पलीकडे जनतेच्या पदरात काहीच पडले नाही. आजी-माजी आमदारांकडून जनतेची फसवणूक झाली आहे. त्यांनी तालुक्याच्या विकासाला महत्त्व देण्याऐवजी स्वतःचा स्वार्थ साधला. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता. यामुळे मतदारांच्या विकासाऐवजी हानी झाली, असा आरोप शेलार यांनी केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.