६५ वर्षीय वृद्ध महिलेचा विनयभंग, एकाविरुद्ध गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील कासारे येथे एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा विनयभंग करण्यात आला. सोमवारी (दि. २१) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर तालुक्यातील कासारे गावात असलेल्या सरकारी दवाखान्यासमोरून रस्त्याने सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ६५ वर्षीय वृद्ध महिला जात असताना आरोपी संजय दादा सोनवणे (रा. कासारे) याने तिला पाठीमागून कवळी मारून 'चल कुठे तरी जावू' असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

यावेळी महिलेस सोडविण्यास मध्ये पडलेल्या साक्षीदारांना आरोपीने शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली. तशा आशयाची फिर्याद पिडीत महिलेने पोलिसांत दिली. याप्रकरणी आरोपी संजय सोनवणे याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.