धूमस्टाईलने साईभक्त महिलेचे गंठण पळविले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आंध्रप्रदेश राज्यातील साईभक्त महिलेच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपये किमतीचे ३६ ग्रॅम वजनाचे गंठण  हेल्मेट घालून वेगाने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धुमस्टाईलने ओरबाडून नेले. सोमवार दि. २१ रोजी रात्री नऊच्या वाजेच्या सुमारास सदर घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, आंध्रप्रदेशमधील करनुल येथील साईभक्त राजू रामदास नुना (वय ७०) तसेच त्यांची पत्नी ईश्वरीअम्मा नुना (वय ६०) हे वयोवृद्ध दाम्पत्य साईबाबांच्या दर्शनासाठी सोमवारी शिर्डी येथे आले होते. त्यांनी पिंपळवाडी रोडवर असलेल्या नारायणबाबा आश्रमात रूम घेतली होती.

सोमवार दि. २१ रोजी रात्री नऊच्या वाजेच्या सुमारास साईमंदिरातून समाधीचे दर्शन करून नारायणबाबा आश्रम येथे जात असताना काळ्या रंगाच्या पल्सर मोटार सायकलवरुन वेगाने आलेल्या हेल्मेटधारी दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या अज्ञात चोराने महिलेच्या गळ्यातील ३७ ग्रॅम वजनाचे १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण ओरबाडून धूम ठोकली. 

राजू रामदास नुना यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिर्डी पोलीसांत अज्ञात चोरट्यांविरुध्द गंठण चोरीचा गु.र.नं.१०५/१८ भा.दं.वी.कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सह.पो.नि.जगदीश मुलगीर करीत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.