संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाक्याच्या बुथमध्ये मालवाहू ट्रक घुसला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-संगमनेर तालुक्यातील नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा येथे असणाऱ्या टोल नाक्याच्या बुथमध्ये मालवाहू ट्रक अचानक घुसल्याची घटना मंगळवारी (दि. २२) दुपारी पावणेपाच वाजेच्या सुमारास घडली. 



याबाबत सविस्तर माहिती अशी की, मोहसीन आमिन खान (वय २२, रा.रंचुका, ता. हातिम, जि.पलवल, हरियाणा) हा त्याच्या ताब्यातील मालवाहू ट्रक (क्र. एमएच १२ एमव्ही ४३५१) पुण्याहून नाशिकच्या दिशेने चालला होता. 

मंगळवारी दुपारी पावणेपाच वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या हिवरगाव पावसा टोल नाक्याजवळ आला असता चालक मोहसीन याने टोलनाक्याच्या बुथ क्रमांक पाचला जोराची धडक मारली. त्यामुळे बुथचेही नुकसान झाले आहे. 

या अपघातामध्ये टोलनाका कर्मचारी मनोज पांडुरंग गोंधळे (रा.कोरेगाव, जि.सांगली) हे किरकोळ जखमी झाले आहे. टोलनाक्याला मालवाहू ट्रक अचानक धडकल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी चालक मोहसिन खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.