बेकायदेशीर संपत्ती आढळली नगरमधील कामगार आयुक्त व पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सेवानिवृत्त सहाय्यक कामगार आयुक्त व त्यांच्या पत्नीविरोधात शासकीय सेवेत असताना गैरमार्गाने गैरमार्गाने मार्च १९८९ ते ऑगस्ट २०१० या कालावधीत १२ लाख ४२ हजार ३१७ रुपयांची अपसंपदा संपादित केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने पती-पत्नीविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानूसार तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, सेवानिवृत्त सहा. कामगार आयुक्त गोरक्ष पांडुरंग आव्हाड यांनी ते शासकीय सेवेत असताना गैरमार्गाने मार्च १९८९ ते ऑगस्ट २०१० या कालावधीत एकूण १२ लाख ४२ हजार ३१७ रुपयांची अपसंपदा त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा एकूण उत्पन्नाचे १९ टक्के अधिकची संपादित केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. 

तसेच त्यांची पत्नी सौ.मंगल गोरक्ष आव्हाड यांनी सदर अपसंपदा संपादित करण्यासाठी सहाय्य केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सन १९८८ चे कलम १३ (१) (ई) सह १३ (२) व भादंवि कलम १०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.