पारनेर मध्ये वाळुच्या भरधाव डंपरने गर्भवती महिलेला चिरडले

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्यातील कान्हुर पठार येथील चौकात बेकायदा वाळुची वाहतुक करणाऱ्या डंपरने महिलेस धडक देऊन चिरडले आहे. त्यामध्ये तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सोनाली किरण गोपाळे (वय 23, रा कर्जुले हर्या ता.पारनेर) असे मृत महिलेचे नाव असून गाडीचे मागील चाके अंगावरून गेल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात सुरू होता. त्यामुळे त्यांना रूग्णवाहिकेतुन नगर येथील रूग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्यांचा काल सायंकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.


-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
-------------------------
मंगळवारी दुपारी सोनाली गोपाळे ह्या एका विविहासाठी कान्हुर पठार येथे बसने आल्या होत्या. बसने खाली उतरून नगर कडे जाणाऱ्या एस टी महामंडळाच्या बसकडे जात असताना टाकळी ढोकेश्वर वरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाळुच्या डंपरने त्यांना जोरात धडक देऊन त्यांना चिरडले त्यात त्या गंभीर जखमी झाल्या

त्यांना त्वरीत ग्रामस्थांनी टाकळी ढोकेश्वर येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले गाडीचे मागील चाके अंगावरून गेल्याने रक्तश्राव मोठ्या प्रमाणात सुरू होता त्यामुळे त्यांना रूग्णवाहीकेतुन नगर येथील रूग्णालयात दाखल केले त्यावेळी त्यांचा काल सायंकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

चालक मद्यधुंद अवस्थेत ! 
यावेळी ग्रामस्थांनी वाळु वाहतुक करणाऱ्या चालकास पकडण्याचा प्रयत्न केला पंरतु तो पळुन गेला गाडीमधील असलेल्या किल्नरला गावातील ग्रामस्थांनी पकडुन ठेवले. त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.