कायदा हातात घेणाऱ्यांना तत्काळ जेरबंद केले जाईल - पालकमंत्री राम शिंदे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. गावठी कट्यातून खूनाच्या घटना घडतात ही दुर्दैवी बाब आहे. अवैधरित्या जवळ हत्यार बाळगणा-यांवर आता कडक कारवाई होणार असल्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी नगर येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
-------------------------
गुन्हेगारीच्या घटनांमुळे राज्यात नगर जिल्ह्याची प्रतिमा मलीन झाली असून, जामखेड व केडगाव हत्याकांडातील आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. कायदा हातात घेणाऱ्यांना तत्काळ जेरबंद केले जाईल,असे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

जिल्ह्यात घडलेल्या हत्याकांडाच्या घटना दुर्दैवी आहेत. जामखेड हत्याकांडातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपींचा १५ पथकांच्या माध्यमातून शोध सुरू आहे तसेच या गुन्ह्याचा जलदगतीने तपास करण्यासाठी विशेष चार टीम कार्यरत करण्यात आल्या आहेत. या घटनेतील सर्व आरोपी लवकरच जेरबंद होऊन त्यांना कठोर शासन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.