अभिनव युवा प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम- डी.डी.गवारे साहेब

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावातील गरजू, होतकरू आणि आर्थिक संकटात सापडलेल्या गावातील बांधवासाठी स्वइच्छेने निधी संकलन करण्यासाठी अभिनव युवा प्रतिष्ठान तर्फे गरजवंतांना आर्थिक सहाय्यता निधी नावाची दानपेटी गावामध्ये दवाखान्यात डॉ. खांबट आणि डॉ.पिसे यांना सुपूर्द करण्यात आली.


यासाठी अभिनव युवा प्रतिष्ठानच्या सर्व मित्रांनी हा उपक्रम राबविला त्याबद्दल त्यांचं कौतुक सर्व स्तरातून होत असून आजची पिढी वाया चालली अस म्हणत असणाऱ्यांना तरुणांनानी दिलेली चांगलीच चपराक आहे अशी प्रतिक्रिया कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डी.डी.गवारे (अप्पर पोलीस अधीक्षक) यांनी दिली.तसेच आपण दिलेला एक रुपया देखील उद्या एखादया गरिबांसाठी खूप उपयोगी पडतो त्यासाठी सर्वानी आपल्याकडील रुपया आपल्या बांधवासाठी दानपेटीत टाकावा असे आवाहन सचिन म्हस्के यांनी केले.

या कार्यक्रम प्रसंगी किसनराव माने सर,सागर फडके,किशोर म्हस्के,अभिनव युवा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री वैभव पुरनाळे तसेच सचिन म्हस्के,ओंकार भुजबळ,रवी मोरे,बाळासाहेब धायतडक,अनिल वावरे,अमोल ढाळे,सचिन कदम,गणेश वावरे,गणेश म्हस्के,ज्ञानेश्वर म्हस्के,अजिनाथ हातमोडे,विकी खैरे,बाळू खैरे,संतोष खडके, अक्षय डांगरे,रवींद्र म्हस्के,विकास म्हस्के,ज्ञानेश्वर तावरे,लक्ष्मण म्हस्के, रितेश ढाळे,पप्पू रेवडकर,अशोक शेळके,भागवत म्हस्के,राहुल खांबट,मच्छिन्द्र म्हस्के,अशोक म्हस्के, योगेश म्हस्के,महेश म्हस्के,एकनाथ म्हस्के,निलेश मोरे,भाऊसाहेब पाचरणे,दीपक म्हस्के,शरद म्हस्के,भारत म्हस्के, विकी मोरे,आदी तरुण मंडळी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.