सांस्कृतिक महोत्सवातून तीन तोळ्याची चैन,दुचाकी लंपास


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर येथे शनिवार दि. १९ मे रोजी वाडिया पार्क मैदानावर आयोजित सांस्कृतिक महोत्सवात गर्दीचा फायदा घेवून लक्ष विचलित करून युवकाच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची चैन चोरून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 


याबाबत सविस्तर माहिती अशी की, सागर जगन्नाथ कानडे (वय २५, रा. जुना टिळक रोड, नगर) हे वाडिया पार्क येथे सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी गेले असता अज्ञात आरोपीने गर्दीचा फायदा घेवून कानडे यांना धक्का देवून त्यांचे लक्ष विचलित करत त्यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची चैन चोरून नेली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. ना. आंधळे हे करीत आहेत.

दरम्यान, बुरुडगाव रोड येथील सदाशिव बबन जाधव हे सांस्कृतिक महोत्सव पाहण्यासाठी गेले असता त्यांनी आपली दुचाकी फिरोदिया हायस्कूलच्या गेट नंबर एक समोर लावली असता अज्ञात चोराने बजाज कंपनीची प्लॅटीना ही १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम. एच. १५ बी. यु.१४८२) चोरून नेली असून या प्रकरणी जाधव यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो. ना. जाधव हे करीत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.