शासन जनतेच्या हिताचे : आ.मोनिका राजळे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यापासून जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन विकासकामे करत असल्याचे मत आ. मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केले. शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भाज़पा जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड होते. 


या वेळी आ. राजळे यांच्या हस्ते जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मंजूर असलेल्या ३९ लाख रुपये खर्चाच्या बंधारा कामाचे भूमिपूजन, पुनर्वसन विभागाकडून मंजूर असलेल्या लक्ष्मी चांदगाव (पुनर्वसन) येथील १० लाख ४५ हजार रुपये खर्चाच्या सभामंडपाचे भूमिपूजन व राज्य शासनाच्या ग्रामविकास फंडातून मंजूर झालेल्या ३३ लाख रुपये खर्चाच्या श्रीराम मंदिर ते पैठण- पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावरील हातगाव-मुंगीपर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, अशा एकूण सुमारे ८३ लाख रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

या वेळी बोलताना आ. राजळे म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेे मुद्रा व उज्वला गॅस योजनेसारख्या अनेक जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाशी निगडीत असलेले असंख्य निर्णय घेत असल्याने, त्यांचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. राज्यात जलयुक्त योजनेतून प्रभावीपणे कामे होत असल्याने अनेक ठिकाणच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला असल्याचे चित्र आहे.

मी आमदार झाल्यापासून मतदारसंघात १५० मोठ-मोठी बंधारे तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यात बोंडअळीचे अुनदान शेवगाव तालुक्याला सर्वात ज़ास्त मिळवून दिले आहे. या वेळी प्रा.बेरड म्हणाले, राज्यात व देशात अनेक वर्ष काँग्रेस पक्षाने सत्ता भोगली. मात्र, त्यांचे निर्णय कार्यकर्त्यांच्या हिताचे होते. आता भाजपाचे राज्यात व केंद्रात सरकार आले असून, या सरकारांचे निर्णय तळागाळातील जनतेच्या हिताचे आहेत.सध्या देशात होत असलेल्या अनेक निवडणुकांमध्ये भाजपलाच जनतेचा कौल मिळत आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.