बजाज फायनान्सच्या ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक करणारे तिघे गजाआड.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  बजाज फायनान्सच्या ग्राहकांना फोन करून “जुने फायनान्सचे कर्ज खाते बंद करण्यासाठी ओटीपी येईल, तो पाठवा’ असे सांगून त्या ओटीपीच्या आधारावर ग्राहकांचे कर्ज खाते पुन्हा उघडून त्यातून मोबाइलची खरेदी करून तो अन्यत्र विकून ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक करणारी तीन जणांची टोळी नगरच्या सायबर पोलीस विभागाने अटक केली आहे. 

या टोळीकडून नगर जिल्ह्यातील सात गुन्ह्यांसह नाशिक विभागातील तब्बल 25 गुन्हे उघडकीस आले आहेत. या तिघांपैकी एक जण बजाज फायनान्समध्ये गेल्या दोन वर्षांपासून काम करीत असून, अन्य दोघे त्याचे साथीदार आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी एका जणाकडे भारतभरातील नोकरदारांसह अनेक बजाज फायनान्सच्या ग्राहकांची कुंडलीच होती; तीही पोलिसांनी जप्त केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या कारवाईत पोलिसांनी या टोळीकडून एक लॅपटॉप, 19 मोबाइल, 12 सीमकार्ड, 2 मेमरी कार्ड, 3 डेबिट कार्ड असा 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने नगर, पुणे, नागपूर, अकोला, धुळे, नाशिक, नवी मुंबई या ठिकाणी 25 ग्राहकांची फसवणूक केली आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.