कालव्यात बुडून तरुणाचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कालव्यात आंघोळ करण्यासाठी गेलेल्या शिर्डी येथील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी बाभळेश्‍वर येथे प्रवरा डाव्या कालव्यात घडली. मृतदेह सोमवारी सकाळी आढळून आला.

अक्षय धनराज तुवर (वय 19, रा. निमगाववाडी, शिर्डी) असे मृत तरुणाचे नाव आहे. अक्षय याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. तो मित्रांबरोबर शनिशिंगणापूर येथे रविवारी दुपारी दर्शनासाठी चालला होता. बाभळेश्‍वर येथे आल्यावर प्रवरा डाव्या कालव्यात तो मित्रांसह आंघोळीसाठी थांबला. कालव्यात उतरताच तो प्रवाहाबरोबर ओढला गेला.

मित्रांनी आरडाओरडा केला; परंतु काही वेळातच तो दूरपर्यंत वाहून गेला. मित्रांनी यानंतरही त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला; परंतु बऱ्याच अंतरापर्यंत तो आढळला नाही.मित्रांनी अक्षयच्या घरी याबाबत कळवल्यानंतर नातेवाईकांनीही त्याचा बराच वेळ शोध घेतला; परंतु तो सापडला नाही. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह बाभळेश्‍वरजवळ आढळून आला. तो आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.