माजी आ.राठोड यांचा कोणताच व्यवसाय नाही तर एवढी संपत्ती आली कोठून ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी खासदार दिलीप गांधी यांच्यावर सडाडून टिका केल्याने आज भाजप पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी आ.अनिल राठोड यांच्यावर टिका करत कोणताच व्यवसाय नसताना एवढी संपत्ती आली कोठून ? असा सवाल ही करण्यात आला आहे.


-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
-------------------------
माझी एलईडीची कंपनी आहेच, तो आमचा उत्पन्नाचा स्त्रोत आहे. त्यावर आम्ही पोट भरतोय तुम्हीही पावभाजीच्याच गाडीवरून आमदार झालात. तुम्ही लोढा हाईट्समध्ये दमदाटी करून जागा बळकावली आहे. तुमचा कोणताच व्यवसाय नाही तर एवढी संपत्ती आली कोठून तुम्हीही तुमचे व्यवसाय जाहीर करावेत असे आव्हान नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी माजी आमदार राठोड यांना केले आहे.

शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी खासदार दिलीप गांधी यांच्यावर सडाडून टिका केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज भाजप पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत घेऊन राठोड यांचे पाळेमूळे उखडून टाकली. यावेळी भाजप शहरजिल्हा उपाध्यक्ष किशोर डागवाले, मंडलाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, किशोर बोरा आदी उपस्थित होते. 
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.