उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या ड्रायव्हरची रेल्वेखाली आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर महापालिकेचे उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या गाडीवर ड्रायव्हर असलेल्या तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली असून गुरूवारी सकाळी हा प्रकार समोर आला.दरम्यान पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.अजय सीताराम बनकर (वय 23) असे आत्महत्या करणार्या तरूणाचे नाव असून तो गेल्या अनेक वर्षापासून बोरुडे फॅमिलीच्या गाडीवर ड्रायव्हर आहे. तो बोरूडे मळा परिसरात अनेक वर्षापासून वास्तव्यास होता. 

पहाटेच्या सुमारास रेल्वेखाली आत्महत्या. 
बुधवारी रात्री आपला मित्र मुंबईहून नगरला येणार आहे, असे त्याने मित्रांना सांगितले होते. त्यासाठी मित्रांनी बनकरला रेल्वेस्टेशनला सोडले. ‘तुम्ही येथून निघून जा, मी त्याला घेऊन येतो’ असे म्हणत बनकरने मित्रांना काढून दिले. त्यानंतर तो एकटाच तेथे राहिला. पहाटेच्या सुमारास त्याने रेल्वेखाली आत्महत्या केली.

आत्महत्या करण्याचे नेमके कारण काय ? 
गुरूवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पोलीस चौकशीत बनकर हा वसंतराव बोरुडे यांच्या गाडीवर ड्रायव्हर असल्याचे पुढे आले. त्याने आत्महत्या का केली? याचे नेमके कारण अजूनतरी समोर आलेले नाही. पोलीस त्याचा तपास करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.