वृध्दाच्या अंगावर पाणी उडाल्याच्या वादातून घडले जामखेड हत्याकांड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड दुहेरी हत्याकांडप्रकरणी बुधवारी मध्यरात्री मुख्य आरोपीसह दोघांना मांडवगण फराटा (ता.शिरूर,जि.पुणे) येथून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. गोविंद गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे.  गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून हत्या 
यातील मारेकरी विजय सावंत अजूनही फरार आहे. किरकोळ कारणांतून तीन जणांनी मिळून योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत राजकीय संबंध नव्हता तर त्यांचे अंतर्गत किरकोळ वाद होते, अशी माहिती पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

दुचाकीवरुन येवून राळेभात बंधूंवर झाडल्या गोळ्या!
शनिवारी (दि.28 एप्रिल) संध्याकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास योगेश राळेभात व राकेश राळेभात जामखेड बाजार समितीच्या आवारातील एका हॉटेलवर बसलेले असताना गोविंद गायकवाड, विजय सावंत व एक अल्पवयीन मुलगा हे तिघे दुचाकीवरुन येवून राळेभात बंधूंवर गोळ्या झाडल्या, यात त्यांचा मृत्यू झाला.

वृध्दाच्या अंगावर पाणी उडाल्यामुळे वाद ...
सन 2016 साली रस्त्यावरुन जाताना राळेभात गटाचा एका वृध्दाच्या अंगावर पाणी उडाल्यामुळे योगेश व गोविंद गायकवाड यांच्यात वाद झाले होते. राळेभात व गायकवाड यांच्यात गेल्या दिड वर्षांपासून शाब्दीक चकमक सुरू होती. त्यातच तीन वेळा योगेशला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता, अशी माहिती समोर आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.