अकोले तालुक्यातील कोंभाळणे घाटात महिलेचा विनयभंग, एकाविरुद्ध गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अकोले तालुक्यातील कोंभाळणे घाटात एका ३५ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी शैलेश सखाराम सदगिर याच्याविरुद्ध अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. 

पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, कोंभाळणे येथील ३५ वर्षीय विवाहित महिला औषधोपचारासाठी केळी रुम्हणवाडी येथे गेली होती. परत येण्यासाठी ती केळी रुम्हणवाडी येथे बस स्टॅण्डवर बसची वाट पहात होती. त्यावेळी मोटारसायकलवरून सोडतो, असे आरोपीने सांगितल्याने महिला त्याच्या गाडीवर बसली.

दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास कोंभाळणे शिवारात कोंभाळणे घाटातून जाताना गाडी थांबवून खाली उतरून आरोपीने महिलेस तु माझ्या बरोबर चल, असे म्हणून तिचा हात ओढला व विनयभंग केला आणि डोक्यावर मारले.

या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून अकोले पोलिसांनी आरोपी शैलेश सखाराम सद्गीर याच्याविरुद्ध गुन्हा रजि.नं. ९५/१८ नुसार भा.दं.वि. कलम ३५४, ३२३ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक बी. बी. गोंदे हे करीत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.